मृत्युंजय कर्ण!!
दिग्विजयी, अजिंक्य धनुर्धर, अंगराज, सेनापती, कुंडलधारी, हिरण्यवर्णी, ब्रह्मज्ञानी, दानशूर,....असा सर्वश्रेष्ठ क्षत्रिय तो! कोण ? सुतपुत्र, सूर्यपुत्र, अधिरथपुत्र, वसुसेन, वसुदादा, जेष्ठ कौंतेय, पहिला पांडव, एकशेएकावा कौरव! छे! कर्ण!! पराक्रमी योद्धा म्हणजे काय ? तर त्याचं सर्वश्रेष्ठ सर्वस्व उदाहरण म्हणजे तो, जसा गरुड सगळ्या पक्षांचा राजा तसा तो, तेजोमय सूर्य किरणांन्ना ही लाजवेल असा मांसल कुंडल धारी, अर्घदानी, राधा मातेचा लाडका, अधिरथ बाबांचा प्रिय, शोणाचा वसूदादा, चंद्रकोरी सारखाच चमकन चमकणारा, सूर्य शिष्य असलेला, सामर्थ्यशाली योद्धा, दुर्योधनाचा सखा, आश्वसथामा चा मित्र, वृषाली, सुप्रिया पती, द्रौपदी ला पक्षाताप करवणारा, मृत सुदामनाचा पिता, सप्तपुत्र शूर, विश्व अजिंक्य करनारा असा क्षत्रिय, कीर्तिश्रेष्ठ इंद्राचा वरदाता, भार्गव रूपी श्रापित ब्रम्हास्र धारी, परशुराम शिष्य असलेला, वासुदेवा लाही क्षणभर नतमस्तक कराव लागेल असा कीर्तिवंत, ब्रह्मरूपी, कीर्तिविशेष सामन्यातला असामान्य नर, अशी कित्येक अग्नी पथांवर विजय प्राप्त केलेला तो सर्वसामान्य क्षत्रिय म्हणून लधलेला, तेज, प्रसन्नता, सम...