अंतर- प्रभावी शिक्षणाचे व मनात असलेल्या जिद्दीचे!!
अंतर - प्रभावी शिक्षणाचे व मनात असलेल्या जिद्दीचे !! - तन्मयी देशपांडे (NSS Volunteer ) नुकताच केलेल्या वनवासी कल्याण आश्रम शाळेतील NSS Camp मध्ये अशा परिस्थिती पुढे आल्या ज्यांनी आपण आपल्या दैनिक जीवनात सोडून आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या गोष्टीची पुन्हा पुन्हा जाणीव व्हायला लागली . तो अनुभव म्हणजे असा की : NSS Camp चा वेळी मुलींच्या वस्तीगृहपलीकडे दिलेल्या खोलीमध्ये राहताना लक्षात आले की दैनिक नेत्यातल्या गोष्टींच्या पुढे जान ही किती कठीण होऊ शकत ! पाच सहा वर्षाची मुलगी धुतलेल्या कपड्यांना वाळू घालायसाठी गॅलरीच्या जाळीवर चढून कपडे वाळू घालत होती यात कधी पाय घसरला तर ? या भीतीने आंंगाला ला काटे येऊ लागले .. जरा वेळाने कुतूहलाने आम्ही त्यांच्याशी जवळ जाऊन संवाद साधायचा प्रयत्न केला परंतु पहिल्या प्रयत्नात यश काही आले नाही , जेवताना या मुलांच्या बरोबर बसून बोलायला गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागसता , आनंदीपणा आम्हाला दिसू लागला. त्यात संवाद साधताना लक्षात असे आले की ही मुलं कातकरी समाजा मधली आहेत आणि NSS स्वयंसेवकांना अशी सवय असते की आपली जेवलेली भ...