कारसेवकांच्या मनात नेमक होत तरी काय ?
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥ सण १९९२, अयोध्येतले वास्तु तोडायला गेलेल्या कारसेवकांच्या मनात नेमके होत काय? याच उत्तर एका कहाणीतन सांगायच झाला तर, माझे बाबा अणि अशेच शेकडो कारसेवक कारसेवक द्यायला १९९२ मधे अयोध्येला रामाच्या श्रध्दे साठी गेलेले. बाबांच सांगायच झाल तर घरी न सांगताच ते ३ डिसेंबर ला अमरावती मधील ४०० कारसेवकांसोबत अयोध्येला निघाले. फैझाबाद ते अयोध्या ५ डिसेंबर ला सगळे कारसेवक पायी घोषणा देत निघाले. फैजाबाद अयोध्या या दोन्ही ठिकाणी छावणीचे स्वरूप आले होते रॅपिडक्शन फोर्स सीआरपीएफ व उत्तर प्रदेश पोलीस यांनी अक्षरशः अयोध्या घेरून घेतली होती . मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या टेंट मध्ये सगळ्या कारसेवकान्नी मुक्काम केला. ६ डिसेंबर ला पहिले घुमट पाडण्यात आले. पहिला घुमट पडल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी पोहचून कार सेवेमध्ये योगदान दिले. संध्याकाळी तिसरा व शेवटचा घुमट पडला व जय श्रीराम जयघोषाने सर्व आसमंत निनादून गेला त्याचवेळी टिनाच्या शेडमध्ये श्रीरामललाची मूर्ती ची स्थापना केली गेली होती. सगळ्या कारसेवकान्नी अगदी रामललाच्या पायावर ड...