अंतर- प्रभावी शिक्षणाचे व मनात असलेल्या जिद्दीचे!!
अंतर - प्रभावी शिक्षणाचे व मनात असलेल्या जिद्दीचे !!
- तन्मयी देशपांडे (NSS Volunteer )
नुकताच केलेल्या वनवासी कल्याण आश्रम शाळेतील NSS Camp मध्ये अशा परिस्थिती पुढे आल्या ज्यांनी आपण आपल्या दैनिक जीवनात सोडून आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या गोष्टीची पुन्हा पुन्हा जाणीव व्हायला लागली .
तो अनुभव म्हणजे असा की :
NSS Camp चा वेळी मुलींच्या वस्तीगृहपलीकडे दिलेल्या खोलीमध्ये राहताना लक्षात आले की दैनिक नेत्यातल्या गोष्टींच्या पुढे जान ही किती कठीण होऊ शकत ! पाच सहा वर्षाची मुलगी धुतलेल्या कपड्यांना वाळू घालायसाठी गॅलरीच्या जाळीवर चढून कपडे वाळू घालत होती यात कधी पाय घसरला तर ? या भीतीने आंंगाला ला काटे येऊ लागले ..
जरा वेळाने कुतूहलाने आम्ही त्यांच्याशी जवळ जाऊन संवाद साधायचा प्रयत्न केला परंतु पहिल्या प्रयत्नात यश काही आले नाही , जेवताना या मुलांच्या बरोबर बसून बोलायला गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागसता , आनंदीपणा आम्हाला दिसू लागला. त्यात संवाद साधताना लक्षात असे आले की ही मुलं कातकरी समाजा मधली आहेत आणि NSS स्वयंसेवकांना अशी सवय असते की आपली जेवलेली भांडी धुवून ठेवायची , त्या मुलांबरोबर आम्ही नळाच्या तिथे ताट धुवायला गेलो तेव्हा लक्षात आले की ती मुलं ताट धुण तेच पाणी पीत होती हे बघून आम्ही जरा अचंबितच झालो , त्यातनं लक्षात असे आले की कातकरी समाजात ही एक विधीच आहे ज्याने की ती पोरं त्यांची संस्कृती जपत होती , बोलता बोलता आम्हाला त्यांच्यातली शिक्षणाची भूक लक्षात आली आणि त्या त्यासाठी ते अविरत कष्ट सुद्धा करायला तयार होती .
पण मग प्रश्न येतो की ही मुले मागे का पडतात ? दहावी नंतर शिक्षण का सोडतात ? या समाजाला बाहेरच्या जगातल्या स्पर्धेचा कसं कळणार ? त्यांच्यात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले ,साठे ,नेहरू या व्यक्तिमत्त्वांना बाहेर कोण आणणार ?
त्यामुळे आम्ही शिक्षकांशी बोलायचं ठरवलं , त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की शाळेत सोयींची कमी नाही ! पण शिक्षकांना सुद्धा त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जात नाहीत , असलेल्या ज्ञानाचा उपयोग पोरांना कसं करून द्यायचा याच्याबद्दल त्यांच्यात रुची नाही ..
विद्वेविना मती गेली,
मती विना गती गेली,
गती विना वित्त खचले
इतके अनर्थ एक अविद्वेने केले’
हे वाचून आपल्याला आठवण झाली असेल फुले घराण्याची ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी जीवाचं रान केलं,शिक्षणामुळे समाजात विशिष्ट बदल होऊ शकतो हे त्यांनी त्या वेळेसच सांगितले होते. पण या त्यांच्या अनुभवातून लक्षात येत की शैक्षणिक क्षेत्रात ज्ञान पोहोचवणे ही खूप मोठी शोकांतिका आहे .
चांगलं, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे आणि जगातल्या स्पर्धेत खरे उतरणे हा त्या पोरांचाही अधिकार आहे .
जरी बालमजुरी बंद झाली असेल, बेटी बचाव बेटी पढाव अशा योजना देशात आल्या असतील परंतु आपल्या सहभाग शिवाय क्षणिक क्षेत्राला वेग येणे शक्य नाही , याचमुळे आपण समाजाला काहीतरी देणे लागतो ही एक महत्त्वाची जाणीव होणे गरजेचे आहे ,यात आपले सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार , नक्कीच !!
- तन्मयी देशपांडे (NSS Volunteer)

Comments
Post a Comment