कारसेवकांच्या मनात नेमक होत तरी काय ?
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥
सण १९९२,
अयोध्येतले वास्तु तोडायला गेलेल्या कारसेवकांच्या मनात नेमके होत काय?
याच उत्तर एका कहाणीतन सांगायच झाला तर,
माझे बाबा अणि अशेच शेकडो कारसेवक कारसेवक द्यायला १९९२ मधे अयोध्येला रामाच्या श्रध्दे साठी गेलेले.
बाबांच सांगायच झाल तर घरी न सांगताच ते ३ डिसेंबर ला अमरावती मधील ४०० कारसेवकांसोबत अयोध्येला निघाले. फैझाबाद ते अयोध्या ५ डिसेंबर ला सगळे कारसेवक पायी घोषणा देत निघाले. फैजाबाद अयोध्या या दोन्ही ठिकाणी छावणीचे स्वरूप आले होते रॅपिडक्शन फोर्स सीआरपीएफ व उत्तर प्रदेश पोलीस यांनी अक्षरशः अयोध्या घेरून घेतली होती . मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या टेंट मध्ये सगळ्या कारसेवकान्नी मुक्काम केला. ६ डिसेंबर ला पहिले घुमट पाडण्यात आले. पहिला घुमट पडल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी पोहचून कार सेवेमध्ये योगदान दिले. संध्याकाळी तिसरा व शेवटचा घुमट पडला व जय श्रीराम जयघोषाने सर्व आसमंत निनादून गेला त्याचवेळी टिनाच्या शेडमध्ये श्रीरामललाची मूर्ती ची स्थापना केली गेली होती. सगळ्या कारसेवकान्नी अगदी रामललाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतले व कृत कृत्य झाले. त्यावेळी खुदाई मध्ये राम मंदिराचे विविध अवशेष मिळाले तीन फूट घेरीचा पितळीचा घंटा राम ललाची मूर्ती असे पुष्कळ अवशेष निघू लागले त्यानंतर त्यांनी दोन दिवस थोड्या थोड्या वेळानंतर मलमा उपसण्याचे काम केले.
31 वर्षांपूर्वींच्या अयोध्या भूमीत पावन झालेले बाबांचे चार दिवसांचे वास्तव्य आजही ते सांगतात अणि ऐकायला एकदम आनंदमय वाटतं. त्यांचा मनात कुठलाही धर्म किंवा प्रांतांच्या विरुद्ध जायच असा विचार नसून निवळ राम प्रेम, आदर हे एक मात्र कारण होत.
आता काहींना प्रश्ण असेल
कारसेवक म्हणजे काय ? कारसेवक हे लोक आहेत जे धार्मिक कारणासाठी त्यांच्या सेवा विनामूल्य करतात , ही संज्ञा संस्कृत शब्द 'कर' (हात) आणि 'सेवक' (सेवक) पासून बनलेली आहे.
अयोध्यास्थित कारसेवक हा एक गट आहे ज्यांनी अनेक दशकांपासून अयोध्येत राम मंदिराची मागणी केली आणि ती मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष केला.
आज २२ जानेवारी २०२४ ला अश्या शेकडो कारसेवकांच्या मदतीने राम जन्म भुमि वर, अयोध्येला शरयू नदी चा काठी राम मंदीर उभारण्यात आलय.
तर दिवाळी तर सगळांनीच साजरी केली पण कोणी श्री रामांच्या आदर्श बदल विचार केलाय का?
त्यांना आपल्या जगण्यात, विचारात आणण्याचा विचार केलाय का?
हा विचार तरही करणे म्हणजेच एकप्रकारे प्रभु रामाचे आदर्श जगणे अस असेल का!! Engineering aspect नि जर विचार केला तर होच! कारण कुठल्या पण गोष्टीची सुरुवात ही आमच्यात तर Planning नीच होते अणि Implementation करणे म्हणजेच,
"दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मज ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥"
"May the grand inauguration of श्रीराम मंदिर, अयोध्या bring not just the physical manifestation of divine grace but also inspire us to implement the ideals of Lord Rama in our lives. Let the spirit of unity, devotion, and righteousness guide our actions and contribute to the well-being of all. As we celebrate this auspicious occasion, may the blessings of श्रीराम be the eternal source of joy, peace, and harmony for all.
"जय श्रीराम!🚩🚩"
- Tanmayee Nitin Deshpande 💫




Comments
Post a Comment